भजनी मालिका
← भजनांकडे परत

मनाचेनि मनें केला हा निर्धार

manacheni manen kela ha nirdhar

रचनाकार: संत बंका · अभंग
मनाचेनि मनें केला हा निर्धार । भवसिंधुपार तरावया ॥१॥ नामाची चांगले नामची चांगले । जडजीव उध्दरले नेणों किती ॥२॥ नाम निजनौका संताची संगती । हेची श्रीपती द्यावी मज ॥३॥ बंका म्हणे देवा पुरवावी आळी । देईन जीव बळी संता पायी ॥४॥