भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन निवटलें ज्ञान सांडवलें

man nivatalen dnyan sandavalen

मन निवटलें ज्ञान सांडवलें । ठाणदिवी केलें ध्यानालागीं ॥१॥ उमटल्या ध्वनि कृष्ण नामठसे । सर्व हृषीकेश भरला दिसे ॥२॥ दिशा दुम ध्यान हारपली सोय । अवघा कृष्ण होय ध्यानींमनीं ॥३॥ निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु । कृष्णचि उपवडु दिसतसे ॥४॥