भजनी मालिका
← भजनांकडे परत

माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो निराळे वरील सारी

makada disati kanvati narala | bhokta to nirale varil sari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता तो निराळे वरील सारी ॥१॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥ सुनियांसी क्षीर चारील्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥२॥ तुका म्हणे मूर्ख वागविती भार । नेतील तें सार परीक्षक ॥३॥