भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों

magayas gelon sidori | tujhya mayagharin ganjiyelon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥१॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥ वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥२॥ तुका म्हणे तूं आम्हां वेगळा । राहें गोपाळा म्हणउनी ॥३॥