भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें

magatyachi kothen ghadate niras | lenkara udas nahin hoten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥१॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥ झाला तरी वेळ कवतुकासाठी । निर्दया तों पोटीं उपजेना ॥२॥ तुका म्हणे त्यासी ठाउकें उचित । होईंल संकेत नेमियेला ॥३॥