भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान

magata bhikari jalon tujhe dvarin | dei maj hari krupadan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥ तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥