भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा

maganen ten ek tujaprati ahe | deshi tari pahen panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥१॥ या संतांसी निरवीं हें मज देई । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥२॥ तुका म्हणे आतां उदार होई । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥३॥