भजनी मालिका
← भजनांकडे परत

मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद

madhyabindanad unmani svanand

मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद । रूपरस गोविंद गुणनिधी ॥ १ ॥ तें रूप सुरवर सेविती अरुबार । नित्यता सविचार भोगिताती ॥ २ ॥ गौळिया गोजिरें दैवत साचारें । नंदासि एकसरे प्रेम देत ॥ ३ ॥ निवृत्ति निवाला प्रेमरसें धाला । सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥ ४ ॥