भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसों येतो

loh kaph gara siddha he samugri | agni tanatkari dison yeto

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अग्नी टणत्कारी दिसों येतो ॥१॥ सांगावें तें काई सांगावें तें काई । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥ अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥ तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥