भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें

loh chumbakachya balen | ubhen rahilen niralen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥१॥ तैसा तूं चि आम्हांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥२॥ तुका म्हणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥३॥