भजनी मालिका
← भजनांकडे परत

लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी

lilavigrahi to levavi khavavi | yashoda baisavi mandivari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥ध्रु.॥ नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासि ॥२॥ हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे म्हणे तीस पोट धालें ॥३॥ पोट धालें मग देतसे ढेंकर । भक्तीचें तें फार तुळसीदळ ॥४॥ तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥५॥ क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥६॥ देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥७॥ त्यांचा हा अंकित सर्व भावें हरी । तुका म्हणे करी सर्व काज ॥८॥