भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त

lenkarachen hit | vahe maulichen chitta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥ तुका म्हणे माझें । तैसे तुम्हां संतां ओझें ॥३॥