भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें

lekarachi ali na puravi kaisi | kay tayapashin unen jalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥१॥ आम्हां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रम्हज्ञान आत्मिस्थति ॥ध्रु.॥ वचनाचा घेईन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥२॥ तुका म्हणे माझी भोळिवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥३॥