भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी

lekara aiten pityachi jatan | davi nijadhan sarva jodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लेकरा आईतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥१॥ त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥ भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥२॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥३॥