भजनी मालिका
← भजनांकडे परत

लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें

lay lakshi man na rahe nishchal | mukhya tethen bal asanachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवि ॥ध्रु.॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥ कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥ भक्ती तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥ तुका म्हणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥