भजनी मालिका
← भजनांकडे परत

लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा

laukikapurati navhe majhi seva | ananya keshava das tujha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥ म्हणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥ एकविध आम्ही स्वामिसेवेसाठी । वरी तोचि पोटीं एकभाव ॥२॥ तुका म्हणे करीं सांगितलें काम । तुम्हां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥