भजनी मालिका
← भजनांकडे परत

लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले

lamb lamb jata kay vadhavuni | pavaden gheuni krodhen chale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥१॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥ सेवी भांग आफू तंबाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥२॥ तुका म्हणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥३॥