भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी

laj vate maj maniti he lok | hen ton nahin ek majhe angi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥१॥ मोजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥ कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥२॥ चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥३॥ तुका म्हणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥४॥