भजनी मालिका
← भजनांकडे परत

लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी सांभाळिला लागे घात

ladival mhanoni nishthur na bola | pari sambhalila lage ghat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लडिवाळ म्हणोनी निष्ठुर न बोला । परी सांभाळिला लागे घात ॥१॥ बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥ नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठुर उत्तरा कोमेजना ॥२॥ तुका म्हणे तुम्ही कृपावंत हरी । शांतवी उत्तरीं अमृताच्या ॥३॥