भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण

ladachya uttarin vadhaviti kalahe | ha to amangal jatigun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥१॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥ कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥२॥ तुका म्हणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा क्षतें धुंडी ॥३॥