भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाभ पुढें करी । घात नारायण वारी

labh pudhen kari | ghat narayan vari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥१॥ ऐसी भक्ताची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥ माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥२॥ तुका म्हणे नाड । नाहीं शरणागता आड ॥३॥