भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला

kunkavachi thevathevi | bodakadevi kashala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥१॥ दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥ दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥२॥ तुका म्हणे झोंडगीं हो । फुंदा कां हो कोरडी ॥३॥