भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे

kumudini kay jane to parimal | bhramar sakal bhogitase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुमुदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आम्ही च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥२॥ तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥३॥