भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे

kuladharma dnyan kuladharma sadhan | kuladharmen nidhan hata chadhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हाता चढे ॥१॥ कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥२॥ कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥३॥ तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव । यथाविध भाव जरीं होय ॥४॥