भजनी मालिका
← भजनांकडे परत

कुचराचे श्रवण । गुणदोषांवरी मन

kucharache shravan | gunadoshanvari man

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कुचराचे श्रवण । गुणदोषांवरी मन ॥१॥ असोनियां नसे कथे । मूर्ख अभागी तें तेथें ॥ध्रु.॥ निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥२॥ पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥३॥ हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥४॥ फजीत करूनि सोडीं । तुका करी बोडाबोडी ॥५॥