भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून

kshudheliya anna | dyaven patra na vicharun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥१॥ धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥ द्रव्य आणि कन्या । येथें कुळ कर्म शोधण्या ॥२॥ तुका म्हणे पुण्य गांठी । तरिच उचिताची भेटी ॥३॥