भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें

kshudharathi annen dushkalen pidilen | mishtanna dekhilen tenen jaisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥१॥ तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥ मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥२॥ तुका म्हणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥३॥