भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख

kshem mayabap pusen hen adhin | na ghalin hen madhin sukh duhkh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥ न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥ अंतरींचें संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील ॥२॥ पायांवरी डोई ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आळींगून ॥३॥ तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥४॥