भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं

ksharala sagar ganga oghin mile | apan chi khele apanashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥ ॥ मधील ते वाव अवघी उपाधि । तुम्हां आम्हांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥ घट मठ झाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥ ॥ तुका म्हणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥३॥