भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा

kshanakshanan jiva vatatase khanti | athavati chittin pay deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥ येई वो येई वो येई लवलाहीं । आलिंगुनि बाहीं क्षेम देई ॥ध्रु.॥ उताविळ मन पंथ अवलोकी । आठवती चुकी काय जाली ॥२॥ तुका म्हणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडीं वेगी ॥३॥