भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी

kshamashastra jaya narachiya hatin | dushta tayaprati kay kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥१॥ तृण नाहीं तेथें पडिला दावाग्नि । जाय तो विझोनि आपसया ॥२॥ तुका म्हणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥३॥