भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज

kothen bhog urala atan | athavitan tuj maj

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥१॥ आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥ उद्वेग ते वांयांविण। कैंचा सीण चिंतनें ॥२॥ तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ॥३॥