भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल

koradya goshti chavatya bol | shikalya sange nahin ol

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोरड्या गोष्टी चावट्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥१॥ कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥ घरोघरीं सांगती ज्ञान । भूस सिणें कांडिती ॥२॥ तुका म्हणे आपुल्या मति । काय रितीं पोकळ ॥३॥