भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वां थोर मानियेली

konen tujha sang kela angikar | nishchint tvan thor maniyeli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंत त्वां थोर मानियेली ॥१॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥ तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥ कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिवसेदिवस बळ क्षीण होतें ॥३॥ तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥