भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा

kone ganvin ahe sanga ha viththal | jari thava asel tumhan kona

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥ लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥ गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥ सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥ तुका म्हणे गाईवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥