भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा

konachya adharen karun mi vichar | kon deil dhir majhya jiva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देईल धीर माझ्या जीवा ॥१॥ शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥२॥ कलियुगीं बहु कुशळ हे जन । छळितील गुण तुझे गातां ॥३॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥४॥ तुका म्हणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥५॥