भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा

kon tyacha par pavala dhunditan | pudhen vicharitan vishvambhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥१॥ अणुरेणु सूक्षमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥२॥ दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृष्टि कृष्णलोक ॥३॥ तुका म्हणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥४॥