भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें

kon punyen yancha hoin sevak | jinhin dvandadik duravilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण पुण्यें यांचा होईन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥१॥ ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥ बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥२॥ तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडईन ॥३॥