भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण पुण्य कोण गांठी । ज्यासी ऐसीयांची भेटी

kon punya kon ganthi | jyasi aisiyanchi bheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण पुण्य कोण गांठी । ज्यासी ऐसीयांची भेटी ॥१॥ जीही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥ध्रु.॥ कोण हा भाग्याचा । ऐसियाची बोले वाचा ॥२॥ तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसाराची तुटी ॥३॥