भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस

kon parvakal pahasil tith | hoten majhen chitta kasavis

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥१॥ पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥२॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥३॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥४॥ तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥५॥