भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान

kodiyachen gorepan | taisen ahankaridnyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीज्ञान ॥१॥ त्यासि आता रिझे कोण । जवळी जातां चीळसवाणी ॥ध्रु.॥ प्रेतदेह गौरविलें । तैसें विटंबवाणें झालेलें ॥२॥ तुका म्हणे खाणें विष्ठा । तैशा देहबुद्धीचेष्टा ॥३॥