भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा

kay urali te karun vinavani | vechalon vachanin panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥ माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुम्हां जगीं सोयरिका ॥२॥ तुका म्हणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचा ठायीं ॥३॥