भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती

kay unen maj panduranga payin | riddhisiddhi thayin volagati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥ स्वर्गसुखें आम्हीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥२॥ तुका म्हणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥३॥