भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं

kay sukh ahe vaugen bolatan | dhyatan pandharinatha kashta nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥१॥ सर्वकाळ वाचे उच्चारितां हरी । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥ रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥२॥ तुका म्हणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥३॥