भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका

kay sahatosi phuka | majha budavila ruka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥ रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ चौघांचिया मतें। आधीं खरें केलें होते ॥२॥ तुका म्हणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥३॥