भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते

kay nahin mata gauravit bala | kay nahin lala palit te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥१॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥ अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥२॥ लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥३॥ तुका म्हणे स्तुति योग्य नाहीं परी । तुम्हां लाज थोरी अंकिताची ॥४॥