भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे

kay nahin majhe antarin vasati | vyapak ha bhutin sakalan nande

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥ चित्तासी प्रसाद होईल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥ सर्व शिक्त जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत आपुलें तें ॥२॥ तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥३॥