भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय माझें नेती वाईट म्हणोन । करूं समाधान कशासाठी

kay majhen neti vait mhanon | karun samadhan kashasathi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय माझें नेती वाईट म्हणोन । करूं समाधान कशासाठी ॥१॥ काय मज लोक नेतील परलोका । जातां कोणा एका निवारील ॥ध्रु.॥ न म्हणें कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥२॥ सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥३॥ तुका म्हणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥४॥