भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं

kay magaven kavanasi | jyasi magon to majapashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥१॥ जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें॥ध्रु.॥ जरी मागों ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥ स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥३॥ मागो जरी पद वैकुंठ । ते तव येकदेशी करंटे ॥४॥ आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥५॥ तुका म्हणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥६॥