भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय करतील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें

kay karatil kelin nitya papen | vase nam jyapen vithobachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय करतील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥ विष्णुमूर्तीपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥२॥ तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥३॥